जगदगुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी महाराज यांचा १४ व १५ मार्च दरम्यान समस्या मार्गदर्शन

Foto
लाखो भाविकांची उपस्थिती राहणार; कार्यक्रमाची जय्यत तयारी

छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो): जगदगुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी, जगदगुरू रामानंदाचार्य दक्षिण पीठ, नाणीजधाम (ता. जि. रत्नागिरी) यांचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा १४ व १५ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता, स्थळ म्हसोबा मंदिर जवळ, जळगाव रोड, चौका, ता. फुलंब्री जिल्हा छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी संस्थानाच्या अंधश्रद्धा निर्मूलन उपक्रमांतर्गत आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रमाच्या अनुषंगाने संस्थानाच्या वतीने अनेक सामाजिक उपक्रम राबविले जातात जसे की, ग्रामस्वच्छता अभियान, शैक्षणिक उपक्रमांतर्गत इंग्रजी माध्यमांची मोफत शाळा, मोफत वेदपाठ शाळा, वैद्यकीय उपक्रमांतर्गत मोफत दवाखाना, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे पुनर्वसन, महिला सक्षमीकरण अंतर्गत मोफत शिलाई यंत्र वाटप, मोफत घरघंटी वाटप, आपत्कालीन मदत उपक्रम, कायदेविषयक साक्षरता शिबिरे, रक्तदान शिबिरांतर्गत या वर्षी जानेवारी २०२६ मध्ये घेतलेल्या रक्तदान शिबिरांच्या माध्यमातून ४ जानेवारी ते १८ जानेवारी अवघ्या १५ दिवसांमध्ये
१, ७१,१५० रक्त कुपिकांचे संकलन करून महाराष्ट्र शासनाच्या महाराष्ट्र रक्त संक्रमण परिषदेला सुपूर्द करण्यात आले. एक पेड माँ के नाम वृक्षारोपण उपक्रमांतर्गत १, १०, ६८७वृक्षारोपण नोव्हेंबर २०२५ महिन्यांमध्ये करण्यात आले. 

मोफत रुग्णवाहिका सेवा महामार्गावरील अपघातग्रस्तांसाठी राज्यातील सहा राष्ट्रीय महामार्गावर ५३ रुग्णवाहिका विनामूल्य सेवा करत आहेत. आतापर्यंत ३१ हजार हून अधिक जखमींचे प्राण वाचण्यात यश आले आहे. संस्थानाच्या उपक्रमांतर्गत ज्या रुग्णांना रक्ताची गरज भासते त्या रुग्णांना त्या हॉस्पिटल येथे जाऊन आज पर्यंत २५ हजार पेक्षा रुग्णांना रक्त देऊन प्राण वाचवले आहेत.
सप्टेंबर २०१६ ते मार्च २०२६ या कालावधीत १८३ मरणोत्तर देह व १३१ मरणोत्तर अवयव दान समाजाच्या सेवेसाठी शासकीय मेडिकल कॉलेजना सुपूर्द करण्यात आले आहेत. इत्यादी उपक्रम आयोजित केली जातात.

या कार्यक्रमासाठी मराठवाडा उपपिठ अंतर्गत जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, भाविक भक्त, साधक, शिष्य, हितचिंतक यांनी १४ व १५ मार्च २०२६ रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रवचन व दर्शन सोहळ्याचा लाभ घ्यावा. १४ मार्च २०२६ रोजी साधक दीक्षा व दिनांक १५ मार्च २०२६ रोजी उपासक दीक्षा कार्यक्रम संपन्न होणार आहे.

तरी जास्तीत जास्त भाविकांनी उपासक दीक्षा व उपासक यांनी साधक दीक्षा घेण्यासाठी नोंदणी करावी. या समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्यासाठी येणाऱ्या भाविकांसाठी कार्यक्रमाच्या दोनही दिवस महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे. तरी या मंगल समयी आपण सर्वांनी सहकुटुंब, सहपरिवार, तसेच मित्रांसह उपस्थित राहून परमश्रद्धेय रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रवचन व दर्शनाचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन मराठवाडा पिठ समिती, छत्रपती संभाजीनगर जिल्हा सेवा समिती यांच्या वतीने करण्यात येत आहे.